महायुतीच्या मंत्रिपदाच्या पहिल्या यादीत शिवेंद्रराजेंचे नाव आघाडीवर.....

भाऊसाहेब महाराजांच्या नंतर पहिल्यांदाच मिळणार साताऱ्याला मंत्रिपद.....
News Image

सातारा जावली विधानसभा मतदार संघाचे आमदार शिवेंद्रराजे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य घेऊन पाचव्यांदा निवडून आले असून भाजपच्या संभाव्य मंत्रिमंडळात पहिल्या यादीत मंत्री म्हणून शिवेंद्रराजे यांचे नाव आघाडीवर असून त्यांच्या कार्यकर्त्यांकडून देखील शिवेंद्रराजे यांना मंत्रीपद द्यावे अशी मागणी होत आहे नेमकं काय कार्यकर्त्यांच्या भावना आहेत .

स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले उर्फ भाऊसाहेब महाराज यांनी 1978 मध्ये जनता पक्षाचे उमेदवार म्हणून राजकारणात प्रवेश केला आणि पहिलं विधानसभेचे मैदान मारल्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही यानंतर 1980 मध्ये निवडून येत बॅरिस्टर अंतुले यांच्या मंत्रिमंडळात गृह कृषी पाणीपुरवठा आणि ग्रामीण विकास खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम केलं तर 1985 च्या निवडणुकीत पुन्हा बांधकाम खात्याचे राज्यमंत्री आणि 1988 मध्ये कॅबिनेट दर्जाचे सहकार मंत्री पद मिळाले अशा पद्धतीने भाऊसाहेब महाराजांनी 1990 पर्यंत त्यांना मिळालेल्या मंत्रिपदाच्या माध्यमातून मतदार संघाचा कायापालट घडवून आणला मात्र यानंतर साताऱ्याला पुन्हा मंत्रीपद मिळाले नाही , शिवेंद्रराजें सलग पाचव्यांदा निवडून आले असून शिवेंद्रराजे यांनी देखील कोणत्याही प्रकारचे पद नसताना देखील आपल्या मतदारसंघाचा कायापालट केला आणि आपल्या विकास कामांच्या जोरावर निवडून आले, त्यांच्या या कामाचा अनुभव पाहता यावेळी भाजपकडून त्यांना मंत्री पद द्यावं अशी सातारा जावली मतदारसंघातील कार्यकर्त्यांची मागणी आहे.

✒️ महेश पवार..

whatsapp
facebook
instagram
youtube