महेश पवार ✒️
सातारा जिल्हा ऐतिहासिक आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला परिसर विशेष म्हणजे सह्याद्रीच्या पर्वत रांगा मध्ये वसलेला , सातारा जिल्हाचा पश्चिम भाग हा अतिशय डोंगराळ असून याठिकाणी असणारी गावे यामुळे आजही संपर्क हिन आहेत या गावांना शहरांच्या संपर्कात आणण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या मागणीवरून शासन निधी मंजूर करून विकास कामांवर भर देताना दिसत आहे . मात्र प्रत्यक्षात अधिकारी शहरापासून दूर असलेल्या या कामामध्ये दोन नंबर करत असल्याचे पहायला मिळते. विशेष म्हणजे या वर्षी केलेला रस्ता पुढच्या वर्षी सोडून द्या एका पाऊसात धुन जातो अशी परिस्थिती सध्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहे .
विशेष म्हणजे या ठिकाणी असलेले अधिकारी बिलो ने टेंडर सोडून द्या दहा टक्के अबाऊ नव्हे तर २०टक्के नी काढण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात यामुळे शासनाचा फायदा करण्याऐवजी हे अधिकारी अनेक टेंडर अबाऊ ने कशी काढता येतील आणि ठेकेदाराचा फायदा करून त्या ठेकेदाराकडून मिळणाऱ्या पाकीटातून आपला खिसा भरून जाऊ तिथे खाऊ ची भूमिका ठेवून काम करणाऱ्या बांधकाम विभागाच्या त्या अधिकाऱ्यांची झाडाझडती करून त्यांना सुता सारखे सरळ करण्याची गरज आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमधून एकच सुर उमटतोय की बांधकाम मंत्री यांनीच आता जिल्हाधिकारी यांना सुचना करून अश्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.