सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभार गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे, बांधकाम विभागाच्या त्या अधिकाऱ्यांमुळे शासनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याची बातमी व जिल्ह्यातील बोगस कामासंदर्भात न्यूज हंट लाईव्ह ने बातमी प्रसिद्ध करताच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावून बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना मंत्री शिवेंद्रसिंह राजे यांनी कामाचा दर्जा सुधारण्याच्या सूचना केल्या व कोणत्याही प्रकारच्या भविष्यात तक्रारी येऊ नये अशी कामे करण्याच्या सूचना या बैठकीदरम्यान दिल्या.