कराड शहर गोळीबाराने हादरले ! जेवत बसलेल्या कुटूंबावरच गोळीबार, दहा वर्षाची मुलगी गंभीर जखमी

गाडी रस्त्यातून काढ म्हटलं म्हणून कुटुंबावरच गोळीबार ,घटनेने कन्हाड शहरासह परिसर हादरला.
News Image

कराड येथील विद्यानगर परिसरात सैदापूर येथील होली फॅमिली स्कूलच्या मागील बाजूस ओम कॉलनीतील अक्षरा रेसिडेन्सी मध्ये रात्री नऊच्या सुमारास किरकोळ कारणावरून कुटुंबावरच गोळीबार केल्याने संपूर्ण कराड शहर हादरून गेले गेले असुन या हल्ल्यात हाऊसिंग सोसायटीच्या अध्यक्षासह दहा वर्षाची मुलगी गंभीर जखमी आहे.

या गोळीबार प्रकरणी सुरेश काळे (वय-38, मूळ रा. तळबीड. सध्या सैदापूर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे .हल्लेखोरास पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या घरातून गावठी पिस्तूल सह 16 जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत.\r\n

शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास काळे सोसायटीमध्ये आला. त्याने त्यांची दुचाकी रस्त्याच्या आडवी लावली. तेथून अध्यक्ष घोलप त्याच वेळी जात होते. त्यांनी काळेना दुचाकी बाजूला लावा असे सांगितले. त्यावरून त्यांच्यात वाद झाला त्याचा राग काळे यांच्या मनात होता तो तिथून गेला. अर्ध्या तासात तो पुन्हा घोलप त्यांच्या घरी गेला त्यावेळी घोलप जेवत होते.

बेल वाजल्याने घोलप यांनी दरवाजा उघडला तर समोर काळे होता. मला तुमच्याशी बोलायचं आहे, असे त्याने घोलप यांना सांगितले. घोलप यांनी जेवण करून आलो आत बसा, असे म्हटले. मात्र त्यांनी बसण्यास नकार दिला. ते जेवत असतानाच घरात घुसलेल्या काळेने थेट फायरिंग चालू केले.यावेळी गावठी कट्ट्यातून झालेल्या फायरिंगमध्ये घोलप यांच्या चेहऱ्याला गोळी लागली. दरम्यान त्यांच्या मुलीच्या दोन्ही हातांना गोळ्या लागल्या आहेत. फायरिंगमुळे तेथे मोठा गोंधळ उडाला. घोलप कुटुंबीयांचा आरडाओरडा मुळे लोक जमले. तत्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले.\r\n

गोळीबार केल्यानंतर सुरेश काळेने स्वतःला घरात कोंडून घेतले होते त्याच्यासोबत त्याच कुटुंब होतं. त्याच्याकडे गावठी कट्टा पिस्तूल असल्यामुळे पोलिसांनी सावधगिरीने दरवाजा उघडण्याची विनंती केली. दरवाजा उघडल्यानंतर काळेने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला शांत करत अचानक त्याला ताब्यात घेतले.यावेळी पिस्तूल कुठे आहे विचारलं असता, तो सांगत नव्हता पोलिसांनी शोध घेतला त्यावेळी त्याच्या धान्याच्या मोठ्या बॅरेलखाली लपवून ठेवलेली पिस्तूल सापडली. त्यासोबत 16 जिवंत काडतुसेही जप्त केली आहेत. घटनेनंतर अवघ्या दहा मिनिटात पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. त्यामुळे संशयीताला पळून जाता आले नाही संशयित पोलीस रेकॉर्ड होईल आहे अशी ही माहिती पोलिसांनी दिली.\r\n

whatsapp
facebook
instagram
youtube