महेश पवार ✍️सातारा शहराला आणि परळी विभागातील त्याचबरोबर माण खटावच्या जनतेची तहान भागवणाऱ्या भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उरमोडी धरण आणि नदीवर हजारो एकर शेती पाण्याखाली आली त्याचबरोबर परिसरातील गावांना देखील या नदीचे पाणी पिण्यासाठी म्हणून दिले जाते , मात्र ऐन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच उरमोडी नदी कोरडी ठणठणीत पडल्याने माणसांना सोडा शेतीला सोडा जलचर प्राण्यांना देखील नदीत पाणी राहिले नाही . यामुळे परिसरातील शेती पाण्याचा आणि परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा तुटवडा ऐन जानेवारी महिन्यांतच जाणवू लागल्याने नदी काठावरील गावांमध्ये सध्या भिषण परिस्थिती निर्माण झाली आहे.
पाणी पट्टी वसुलीला सरसावनारे उरमोडी धरण प्रशासन झोपी गेलं की काय उरमोडी कोरडी पडल्याने नागरिकांचा सवाल..!
उरमोडी नदीकाठावरील शेती बहुतांश ही नदीच्या पाण्यावर असून या परिसरातील नागरिकांना देखील पिण्याच्या पाण्यासाठी उरमोडीचे पाणी असून गेल्या काही वर्षांत नदीवरील उपसा वाढला असून उरमोडी नदीवर असणारे केटी वेअर आणि छोटे बंधारे नादुरुस्त झाल्याने पाणी अडुन न राहता ते नदीमध्ये सोडलेले पाणी वाहून जात आहे. उरमोडी धरण प्रशासनाने आवर्तन पूर्ण झाल्यावर नदी चे पाणी बंद केल्यानंतर पुर्वी जे आठवडा आठवडा नदी मधून वाहायचं ते बंद झाल्याने शेतीसाठी व पिण्यासाठी सोडा नदीमधील जलचर प्राण्यांना पाणी नाही.
उरमोडी नदीचा सर्वे करून नदीमध्ये छोटे छोटे बांध आणि काही केटी वेअर बांधण्याची गरज आहे. अन्यथा उरमोडी नदीकाठावरील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या कृत्रिम टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे उरमोडी धरण प्रशासन फक्त पाणी पट्टी वसुलीला येतं मग लोकांना पाणी मिळतं का नाही हे कोण बघणार कोण करणार उपाययोजना? हा प्रश्न उरमोडी नदीकाठावरील नागरिकांना पडला आहे. यामुळे आता शेतकरी वर्गाकडून उरमोडीच्या पाणी प्रश्नावर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीच लक्ष घालावं अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.