३०२ दाखल तरीही घाडगे हॉस्पिटल सुरू कसं?चिमुकल्यासह आईचा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना ठिय्या आंदोलन करत सवाल?

चार वजनदार मंत्री असलेल्या साताऱ्यात नेमकं चाललंय काय?
News Image

सातारा तालुक्यातील घाडगे हॉस्पिटल, नागठाणे या ठिकाणी हलगर्जीपणामुळे एका बालकाला जीव गमवावा लागला. याबाबत कारवाई व्हावी. म्हणून गेल्या वर्षभरापासून पालक लोकशाही मार्गाने आंदोलन करत न्याय मागत आहेत. आज सातारा जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालया बाहेर अडीच महिन्याच्या चिमुकल्यासह आई-वडील व नातेवाईकांनी आंदोलन केले. दरम्यान ,सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे याबाबत भाष्य करता येत नाही. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे यांनी तोंडी सांगितली. \r\n

नागठाणे येथील घाडगे हॉस्पिटल या ठिकाणी प्रसूतीसाठी आलेल्या एका नवजात बालकाचा हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला होता सदर घटना 1१ फेब्रुवारी २०२३ रोजी घटना घडली होती. त्यानंतर डॉक्टरवर सदोष मनुष्यवादाचा कलम ३०४ अंतर्गत गुन्हा दाखल केला, दरम्यान गुन्हा नोंद व्हावा यासाठी न्यायालयात झगडावे लागले. तरी सदरचे घाडगे हॉस्पिटल अद्याप सुरू असल्यामुळे अनेकांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे. असे आंदोलनकर्ते सोमनाथ बळवंत पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. दरम्यान, जिल्ह्यात चार कॅबिनेट मंत्री असताना अडीच वर्षाच्या बालकांसह आई वडील यांना आंदोलन करण्याची वेळ आली ही गोष्ट फार भयानक असून लोकशाहीची थट्टा होत आहे. यामुळे जिल्हा प्रशासन आता नेमकी काय भूमिका घेतेय हे पाहणं गरजेचं राहील...

whatsapp
facebook
instagram
youtube