सार्वजनिक बांधकाम विभागाने रोड मॅप नुसार कामकाज करावे ना. शिवेंद्रसिंहराजे; मालवण येथील शिवरायांच्या पुतळा उभारणीबाबतही घेतला आढावा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील छ. शिवरायांचा भव्य पुतळा लवकरच बसविण्यात येणार ...
News Image

सातारा- राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरु असलेली कामे वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. सर्व कामे दर्जेदार होण्यासाठी प्रत्येकाने स्वतः लक्ष घालावे. प्रस्तावित विकासकामे करण्यासाठी पुढील १०० दिवसांचा नियोजन आराखडा तयार करून नियोजनबद्ध रोड मॅप तयार करा आणि त्यानुसार कामकाज करा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अधिकाऱ्यांना केल्या. दरम्यान, मालवण येथे नव्याने छ. शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असून या कामाबाबतचाही आढावा त्यांनी यावेळी घेतला.

ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री म्हणून पदभार स्विकारल्यानंतर कामाचा धडाका सुरु केला आहे. मंत्रालयात बांधकाम खात्याच्या सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बठक घेऊन त्यांनी आज प्रादेशिक कामकाजाचा आढावा घेतला. या बैठकीत ना. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. बैठकीला बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, सचिव (रस्ते) सदाशिव साळुंखे, सचिव एस. डी. देशपुते यांच्यासह विभागाचे मुख्य अभियंता व संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शालेय शिक्षण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पणन विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, पर्यटन विभाग व माहिती व जनसंपर्क संचालनालय या विभागांचा १०० दिवसांचा नियोजन आराखडा बैठक घेतली होती. या पार्श्वभूमीवर ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाची प्रादेशिक आढावा बैठक घेतली. बैठकीत राज्यभरात बांधकाम विभागामार्फत सुरु असलेली कामे आणि पुढे करावयाची प्रस्तावित कामे याचा सविस्तर आढावा घेतला. या मॅरेथॉन बैठकीत त्यांनी राज्यातील सर्व जिल्हानिहाय सुरु असलेल्या कामांची माहिती घेतली. विविध प्रकारचे रस्ते, शासकीय, निमशासकीय इमारती बांधकाम व इतर सर्व कामांची सद्यस्थिती जाणून घेऊन सुरु असलेली कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील पुतळा दुर्घटनेनंतर याठिकाणी नव्याने छ. शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या कामासंदर्भातही ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या.

whatsapp
facebook
instagram
youtube