महेश पवार ✍️ सातारा नगरपालिकेमध्ये कामानिमित्त येणाऱ्या मेहरबान यांच्या व काही बेशिस्त वाहनधारकांच्या आडमुठे धोरणामुळे परिसरात रस्त्यावरच गाड्या पार्किंग केल्याने वाहतुकीचा खोळंबा होत असून या ठिकाणी रस्त्यामध्ये वाहन लावल्यामुळे ट्राफिक जाम तर होतेच मात्र या ठिकाणी अपघात देखील होतानाचे चित्र पाहायला मिळते.
मंगळवारी दुपारी नगरपालिकेच्या मागील गेटच्या बाहेर रस्त्यामध्येच गाड्या लावल्याने अचानक समोरून आलेल्या गाडीमुळे व भर रस्त्यावर पार्किंग केलेल्या कारमुळे एका महिलेचा अपघात झाला . मात्र सातारा नगरपालिकेच्या बाहेर अशा पद्धतीने बेशिस्त वाहनांमुळे रोजचा कुटाणा होत असताना देखील सातारा पालिका प्रशासन आणि वाहतूक पोलीसांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. यामुळे वाहन धारकांकडून बेशिस्त वाहन पार्किंग करणाऱ्यांवर कोण कारवाई करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.